अष्टविनायक क्लासेसचे संचालक अमित बोराळे यांचा सत्कार

लोहारा : येथील अष्टविनायक क्लासेसचा 100℅ निकाल लागल्याबद्दल व समिक्षा सोमवंशी हिने गणितात 100 पैकी 100 गुण घेतल्याबद्दल पालकातर्फे संचालक अमित बोराळे सर यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार तसेच तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय जेवळीकर हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक जालिंदर कोकणे,युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार,भाजपा तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला, प्रकाश भगत, हाजी बाबा शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुरेश बिराजदार यांनी बोराळे सर यांच्या यांनी गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी दिल्याबद्दल व क्लासेसची विद्यार्थीनी समिक्षा सोमवंशी 100 पैकीज्ञ100 गुण घेतल्याबद्दल तसेच 40 विद्यार्थी प्रथमश्रेणीत आल्याबद्दल कौतुक करून अभिनंदन केले.यापुर्वीही क्लासेसचे विद्यार्थी अनेक क्षेत्रात नेत्रदिपक कामगीरी केली आहे. क्लासेसच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम,स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येते असे बोराळे यांनी सांगितले.
यावेळी समिक्षा सोमवंशी हिच्या यशाबद्दल पालक बालाजी सोमवंशी व वशिया मुल्ला यांचा सत्कार केला.यावेळी पालक जब्बार मुल्ला, बालाजी सोमवंशी, विकास घोडके,शिवाजी गलांडे, स्वप्नील माटे, सुशांत माशाळकर, श्रीकांत बोराळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विकास घोडके यांनी केले तर आभार अमित बोराळे यांनी मांडले.