लोहारा नगरपंचायत नुतन इमारत बांधकाम व नाना नानी पार्कचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते भुमिपुजन

लोहारा : उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी लोहारा शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून लोहारा शहरात नगर पंचायत कार्यालयाची नूतन इमारत बांधकाम करणे – ५ कोटी रु. व गाव तलावाचे सुशोभिकरण करणे – १० कोटी रु. असा एकूण १५ कोटी रुपयांच्या निधी मंजूर करून घेतला असून रविवार ४ जून रोजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या निधीतून नगर पंचायत कार्यालयाची ३ मजली सुसज्ज इमारत फर्निचरसहित उभारण्यात येणार आहे. तसेच तलाव सुशोभिकरण अंतर्गत बाल उद्यान, ध्यान केंद्र, व्यायामशाळा, व वॉकिंग ट्रॅक आदी सुविधा उपल्बध करून देण्यात येणार आहेत.


यावेळी युवा नेते किरण गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख जगन पाटील, तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नाग्गाण्णा वकील, नगरध्यक्षा वैशाली खराडे, उपनगरध्यक्ष आयुब शेख, गटनेत्या सारीका बंगले, नगरसेविका शामल माळी,कमल भरारे, शम्माबी शेख, आरती गिरी,सुमन रोडगे, आरती कोरे,नगरसेवक अमिन सुंबेकर, जालिंदर कोकणे,विजयकुमार ढगे, गौस मोमिन, अविनाश माळी, मुख्यधिकारी रामकृष्ण जाधववर, ज्ञानेश्वर सुर्यवंशी,अभिमान खराडे, शब्बीर गवंडी,बाळू कोरे, अमोल बिराजदार, श्रीनिवास माळी,श्रीकांत भरारे,राजेंद्र माळी, किशोर पाटील, दिपक रोडगे,ओम कोरे,भगवान मक्तेदार,प्रमोद बंगले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अभिमान खराडे यांनी केले. सुत्रसंचालन अभिजित गोरे यांनी केले. तर आभार जगदिश सोडगे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!