जिल्हा पोलीस मुख्यालयात पारधी समजातील युवकांचे समपोदेशन”

धाराशिव : गुन्हेगारी जमात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आनुन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा पोलीस मुख्यालयातील अंलकार हॉल येथे आज दि. 03.06.2023 रोजी समपोदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मा. श्री. अतुल कुलकर्णी पोलीस अधिक्षक उस्मानाबाद यांच्या संकल्पनेतुन आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला पारधी समाज बांधवाचा मोठा प्रतिसाध मिळाला.
पारधी समाजातील व्यक्ती गुन्हेगारीकडे कोणत्या कारणामुळे वळाल्या, त्यांची कौटुंबिक पार्श्वभुमी, शिक्षण आणि त्यांच्या आर्थिक पुनर्वसनासाठी शासनाच्या योजनांमार्फत कोणत्या उपाययोजणा करता येतील,याची पाहणी करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या पुढाकारातुन हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.
या कार्यक्रमात पारधी समाजाची गुन्हेगारी पार्श्वभुमी, सद्यस्थितीत ते करीत असलेले काम, भविष्यात कोणते काम किंवा नोकरी करण्याची इच्छा आहे अशी विविध विषयानवर प्रश्नावली भरुन घेण्यात आली. तसेच आरोग्यविषयक समस्यांबाबतीत देखील प्रश्नावली तयार करुन ती माहिती भरुन घेण्यात आली.
त्यानंतर मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक,उस्मानाबाद मनोविकार तज्ञ- डॉ. श्री. महेश कानडे, श्रीमती एस.एस. खर्टींग, श्री. परमेश्वर मुळे, श्री. लक्ष्मण शेळके, श्रीमती स्मीता पवार, मानसिक आरोग्य तज्ञ – श्री. अत्तारकर, ॲड. श्रीमती ज्योती बडेकर तसेच जिल्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना गुन्हेगारी पासून परावृत्त होण्या बाबत समपोदेशन केले
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक, उस्मानाबाद , सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. एम रमेश उपविभाग कळंब, प्रो. पोलीस अधीक्षक मनीष कुमार, प्रो.पोलीस उप अधीक्षक गीतांजली दुधाने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. यशवंत जाधव, शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री. उस्मान शेख, आनंदनगर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री. पारेकर, पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री. गायकवाड, सपोनि श्री. अमोल पवार, श्री. गोरे, श्री. चव्हाण पोउपनि श्रीमती मैदांड, पोउपनि श्री. नाईकवाडी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार, पोलीस अधीक्षक कार्यालय येथील अधिकारी अंमलदार व पारधी समाजातील इतर एकुण 100 ते 200 व्यक्ती हजर होते.