मोघा खुर्द येथील युवकांचा शिवसेनेत प्रवेश

लोहारा : लोहारा तालुक्यातील मोघा खू. गावातील अनेक तरुणांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज शनिवार दि.03 जुन 2023 रोजी उमरगा येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार ज्ञानराजजी चौगुले, युवा नेते किरण गायकवाड व जिल्हाप्रमुख मोहन पणूरे यांनी या सर्व युवकांचे स्वागत केले.
चिंतामन दळवे, मारुती मत्ते, लक्ष्मण बोंडगे, शरद भोंडवे, अंगद भोंडवे, अच्युत भोंडवे, अजय भोंडवे, धनराज भोंडवे, भरत मत्ते, मुकेश गरगले, परमेश्वर शिंदे, बिभीषण दळवे, सुनील भोंडवे, सागर मोरे, सुरेश पाटील, विठ्ठल भोंडवे, मनोज भोंडवे, रणजित भोंडवे, लखन शिंदे, लक्ष्मण भोंडवे, दत्ता गरगडे, तात्याराव भोंडवे, शिवाजी भोंडवे, किशोर तडोळे, गणेश बाभळे, उद्धव भोंडवे, आनंद शिंदे आदी युवकांनी यावेळी प्रवेश केला.
याप्रसंगी लोहारा तालुकाप्रमुख जगन पाटील, उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, अभिमान खराडे, योगेश तपसाळे, बालेपिर शेख, संदीप जगताप, कुमार निकम, काकासाहेब चव्हाण, आदी यावेळी उपस्थित होते.