लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल निकाल 91.88 टक्के

 वाणिज्य शाखेतील विद्यार्थी बोकडे वैभव इंद्रजित याने पुस्तपालन आणि लेखाकर्म या विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहेत.

लोहारा : लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोल कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी बारावी बोर्ड 2023 परीक्षेत यश संपादन करून आपली गुणवत्ता सिद्ध केली. कनिष्ठ महाविद्यालयाचा यावर्षीचा तीनही शाखेचा एकूण निकाल 91.88 टक्के असा लागला आहे.
विज्ञान शाखेसाठी एकूण 149 विद्यार्थी प्रविष्ठ होते तयापैकी 4 विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण,71 विद्यार्थी प्रथम श्रेणित उत्तीर्ण,70 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण. वाणिज्य शाखेतील 60 विद्यार्थी प्रविष्ठ होते,5 विद्यार्थी विशेष प्रविण्यासह,25 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण,26 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण. कला शाखेतून 136 विद्यार्थी प्रविष्ठ होते,5विद्यार्थी विशेष प्रविण्यासह,27विद्यार्थी प्रथम श्रेणीत,60 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण आहेत.

अनुक्रमे बारावी विज्ञान शाखा 98.65%, बारावी वाणिज्य शाखा 96.66, बारावी कला शाखा 82.17% असा शाखानिहाय निकाल आहे. कनिष्ठ महाविद्यालयातून बोकडे वैभव इंद्रजित 89%गुण मिळवून प्रथम,हेड्डे तमीर हबीब 83.50% गुण मिळवून द्वितीय तर माळवदकर दीपाली अनंत ही विद्यार्थिनी 83.33% गुण मिळवून तृतीय आली आहे.

शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेतून जगताप अभिषेक शंकर या विद्यार्थ्याने 80.17%गुण मिळवून प्रथम, बनकर रसिका रामलिंग 77% गुण मिळवून द्वितीय, केदार संध्या कमलाकर 76.83%गुण मिळवून तृतीय तर सूर्यवंशी वैष्णवी बालाजी या विद्यार्थिनीने 76.67% गुण मिळवून चतुर्थ क्रमांक मिळविला. बारावी वाणिज्य शाखेतून बोकडे वैभव इंद्रजित 89%गुण मिळवून प्रथम, माळवदकर दीपाली अनंत 83.33%गुण मिळवून द्वितीय, सूर्यवंशी अपर्णा शिवाजी 79.33 %गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवील आहे. बारावी कला शाखेतून हेड्डे तमीर हबीब 83.50%गुण मिळवून प्रथम, काटे सोनाली पांडुरंग 82.17% गुण मिळवून द्वितीय, सूर्यवंशी गायत्री बन्सीलाल 80.83% व पांढरे अविष्कार रमेश 80.83% गुण मिळवून संयुक्तपने तृतीय क्रमांक मिळविला आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती उर्मिला पाटील यांनी सर्व विद्यार्थ्याचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.भारतीय राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव तथा शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शेषेराव जावळे पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अबिनंदन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी श्री दत्ताजी जावळे पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!