व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने लोहारा तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन

लोहारा : पत्रकाराच्या विविध मागण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने च्या वतीने गुरुवारी 11 मे रोडी लोहारा तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
लोहारा तहसीलदार संतोष रुईकर यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे. की, पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी,वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा,कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात. अशी मागणी करण्यात आली आहे.
या धरणे आंदोलनात व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ कांबळे, जिल्हा कार्यवाहक बालाजी बिराजदार, तालुकाध्यक्ष गिरीश भगत, तालुका कार्याध्यक्ष सुधीर कोरे,तालुका उपाध्यक्ष अशोक दुबे,सरचिटणीस सदाशिव जाधव, कार्यवाहक इकबाल मुल्ला,प्रसिद्धी प्रमुख गणेश खबोले, कोषाध्यक्ष बसवराज होणाजे, कालिदास गोरे, जसवंतसिह बायस, मेहबूब फकीर,सुनील सोमवंशी, आदम पठाण,जीवन गायकवाड,जगदीश सुरवसे आदी उपस्थित होते.