उमरगा – लोहारा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी सदाशिव भातागळीकर यांना देण्याची मागणी

सदाशिव भातागळीकर यांना उमरगा – लोहारा विधानसभेची उमेदवारी देण्याची मागणी राष्ट्रीय चर्मकार समाज संघटनेच्या वतीने शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांच्याकडे करण्यात आली आहे.
लोहारा : गेल्या ४० वर्षापासुन शिवसेनेचे निष्ठेने काम करणारे पंचायत समितीचे माजी सदस्य सदाशिव भातागळीकर यांना अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या उमरगा – लोहारा विधानसभा मतदारसंघातुन उमेदवारी देण्याची मागणी राष्ट्रीय चर्मकार समाज संघटनेच्या वतीने माजी समाज कल्याण मंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांच्याकडे करण्यात आली.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या अध्यक्षतेखाली समाजाची तुळजापूर येथे बैठक झाली. या वेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड ,प्रा. जालींदर लोकरे, विकास कदम, अर्जुन लोकरे, विकास गायकवाड, लोहारा तालुकाध्यक्ष बळीराम बनसोडे, जिल्हा संघटक मधुकरराव बिद्री, उमरगा तालुका उपाध्यक्ष रावण कांबळे, शिवाजी वाकळे, विठ्ठल वाकळे, कृष्णा हिराळे यांच्यासह लोहारा व उमरगा तालुक्यातील चर्मकार समाज बांधव उपस्थित होते. या बैठकीत सर्व समाज बांधवाच्या अडचणी सोडवण्याची चर्चा झाली.
१९८४ पासुन शिवसैनिक म्हणुन कार्यरत असलेले सदाशिव भातागळीकर हे कार्यकरत आहेत. उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भातागळीकर यांना उमेदवारी देण्याची एकमुखाने मागणी या बैठकीत करण्यात आली. उपनेते श्री. घोलप यांच्याकडे भातागळीकर यांचा कार्य अहवाल देण्यात आला.