सालेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 68 हजार रुपये किंमतीचा माल लंपास

लोहारा ( जि.धाराशिव ):पोलीसाकडून मिळालेली माहीती अशी की, 27 डिसेंबर रोजी 5 ते 28 डिसेंबर रोजी 9 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सालेगाव उत्तर येथील वर्ग खोल्यांचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून आत प्रवेश करुन वर्गातील तिन 52 इंची एलईडी टिव्ही,दोन 32 इंची एलईडी टिव्ही, एच पी कंपनीचे प्रिंटर, तिन मोबाईल टॅब असा एकुण 68 हजार रुपये किंमतीचा माल चोरुन नेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विश्वनाथ दशरथ लादे, मुख्याध्यापक जि.प. आ. शाळा सालेगाव उत्तर रा. सालेगाव उत्तर ता. लोहारा यांनी 31 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पोलीस ठाणे येथे कलम 457,380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.