मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांचा भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश

हैद्राबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी काल दि . ५ मे रोजी हैद्राबाद येथे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख श्री . चंद्रशेखर राव यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी जाहिर प्रवेश केला.

प्रशांत नवगिरे हे गेल्या २८ वर्षांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांचेसोबत भारतीय विद्यार्थी सेने पासून कार्यरत होते . त्यांनी धाराशिव जिल्हयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुहूर्तमेढ रोवली होती . मनसेचे कार्य करीत असताना त्यांनी जिल्हासंघटक, महाराष्ट्र नवनिर्माण एस .टी . कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनिय कार्य करीत राष्ट्रीय महामार्गाच्या जवळपास १० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामासाठी व जनतेच्या विविध प्रश्नांवर न्याय हक्कांसाठी रास्ता रोको, टोलनाका आंदोलन, बचतगटांच्या महिलांसाठी भव्य मोर्चा अशी अनेक आंदोलने करून सर्वसामान्यांसाठी सतत प्रयत्नशील असत . २०१६ मध्ये त्यांनी तुळजापूर तालुक्यात स्वःखर्चाने जलसंधारणांची कामे केली होती . ती पाहण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः जळकोट व परिसरात आले होते . पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होत.

प्रशांत नवगिरे यांनी सांगितले की, तेलंगणा चे मुख्यमंत्री श्री . चंद्रशेखर राव यांची जनतेच्या विकासासाठी असलेली दूरदृष्टी , प्रचंड इच्छाशक्ती व त्यांचे सर्वसामान्य जनतेसाठी सुरु असलेले कार्य पाहुन आपण प्रेरीत होऊन काल हैद्राबाद येथे त्यांच्या निवासस्थानी भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये प्रवेश केला . यापुढे महाराष्ट्रात या पक्षाचे जाळे वाढवून पक्षसंघटन वाढविणार असुन आगामी काळातील सर्व निवडणुका या पक्षाच्या माध्यमातून लढविण्यात येणार आहेत . याबाबत व इतर विषयांवर श्री चंद्रशेखर राव यांचेशी तासभर चर्चा झाली आहे .

यावेळी भारत राष्ट्र समिती पक्षाचे आमदार जीवन रेड्डी, चंदशेखर राव यांचे अत्यंत विश्वासू प्रविण जेठेवाड, शंकरराव धोंडगे, रणजीत देशमुख यांचेसह मान्यवर उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!