आ. ज्ञानराज चौगुले यांनी मुल्ला कुटूबीयांचे सांत्वन करुन मुलीच्या लग्नासाठी केली 50 हजार रुपयांची मदत

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील फतरु मुल्ला यांचे निधन झाल्यामुळे यांच्या घरी आ.ज्ञानराज चौगुले यांनी शनिवारी 6 मे 2023 रोजी भेट देऊन सांत्वन करुन यांच्या कुटुंबीयांना धिर दिला. व तसेच आ.ज्ञानराज चौगुले यांनी सामाजिक भावना जपत फतरु मुल्ला यांची मुलगी मुस्कान याच्या लग्नासाठी शहरातील ज्ञानज्योती पतसंस्थेत 50 हजार रुपयाची मुदत ठेव करुन मदत केली. यावेळी शिवसेना लोहारा तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, शिवसेना उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुर्यवंशी, माजी नगरसेवक अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, गटनेत्या तथा महिला व बालकल्याण सभापती सारिका बंगले, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, महेबुब मुल्ला, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, रोहयो माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, कॉंग्रेसचे अल्पसंखयाक जिल्हा उपाध्यक्ष इस्माईल मुल्ला, शालेय व्यवस्थापन समिती सभापती के.डी. पाटील, ओम कोरे, आसिफ मुल्ला, आयान बक्षी, बबलु शेख, अब्दुल मुल्ला, अब्दुल जेवळे, आदि उपस्थित होते.