आषाढी एकादशी निमित्ताने प्रति पंढरपूर कानेगाव नगरी विठू नामाच्या गजराने गजबजली

लोहारा : आज गुरुवारी आषाढी एकादशीला श्री संत शिरोमणी सद्गुरू मारुती महाराज यांच्य प्रति पंढरपूर कानेगाव येथे विविध कार्यक्रम पार पडले.
पहाटे काकडा आरती,अभिषेक नंतर 11 वाजता समस्त भजनी मंडळ यांच्या कडून कानेगाव नगरीत गाव प्रदक्षिणा व श्री संत शिरोमणी सद्गुरू मारुती महाराज यांचा पालखी सोहळा आयोजित केला होता यामध्ये हिप्परगा,लोहारा,मोघा,बेंडकाळ,भातागळी येथील दिंडीसह परिसरातील भाविक भक्तगण ग्रामस्थ यासह मोठ्या संख्येने सहभागी झाले होत.
4 वाजता दिंडी मंदिर परिसरात येऊन वारकरी व भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आरती होऊन दिंडी ची सांगता झाली जवळपास दहा हजार भाविक भक्तांनी आज कानेगाव येथे दर्शनाचा आणि महारप्रसादाचा लाभ घेत दर्शन घेतले.
आलेल्या सर्व भाविक भक्त वारकरी यांची महाप्रसाद फराळाची व्यवस्था दरवर्षी प्रमाणे येथील हरिश्चंद्र कदम यांच्या तर्फे करण्यात आली होती या सर्व कार्यामध्ये ग्रामस्थ युवक मित्र लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. याप्रसंगी लोहारा पोलीसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.