कै.राम भरारे यांच्या स्मरणार्थ जेष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी बेंच

लोहारा / प्रतिनिधी

लोहारा शहरातील प्रभाग ७ च्या नगरसेविका श्रीमती कमल राम भरारे यांच्या वतीने कै.राम भरारे यांच्या
स्मरणार्थ जेष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी बेंचची व्यवस्था करण्यात आली.

विजयादशमी च्या मुहूर्तावर प्रभागातील बस स्थानक पाठीमागे आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरं परिसरात बेंच बसविण्यात आले.
बस स्थानक च्या पाठीमागे व रुक्मिणी मंदिरं परिसरात नागरिकांची नेहमीच वर्दळ असते.यामुळे प्रभागातील जेष्ठ नागरिकाना बसण्यासाठी नगरसेविका श्रीमती कमल राम भरारे यांनी हा उपक्रम राबविला.
यावेळी नगरसेविका श्रीमती कमल राम भरारे,युवासेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे,मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, वसंत खबोले, काका आनंदगावकर,विकास होंडराव,मिलिंद बंगले,काका घोडके,शांतेश्वर स्वामी,हणमंत गरड,आशिष झमकडे यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!