स्वराज्य संघटनेच्या लोहारा तालुकाध्यक्षांची निवड

लोहारा / प्रतिनिधी छत्रपती संभाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या तालुका कार्यकारणी संभाजी राजे यांच्या आदेशाने करण गायकर यांनी निवड केली असून यावेळी सदर नियुक्तीचे पञ स्वराज्य संघटनेचे महेश गवळी ,सत्यजित साठे, सामाजिक कार्यकर्ते महेश गोरे ,यांच्या हस्ते देण्यात आले .
यामध्ये तालुकाध्यक्ष म्हणून प्रशांत थोरात यांची निवड करण्यात आली तर सचिव म्हणून बळी गोरे, कार्याध्यक्ष युवराज साळुंखे, तालुका संघटक म्हणून संजय मुर्टे, प्रसिद्धी प्रमुख ओमकार चौगुले, शहर शाखा संघटक शंभू वाले,वैभव पवार,यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी स्वराज्य संघटनेचे महेश गवळी ,सत्यजित साठे, सामाजिक कार्यकर्ते महेश गोरे ,बळीराम धारूळे आदी उपस्थित होते.