जेवळी येथे ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेनिमित्त राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धेस सुरवात

जेवळी, ( ता.लोहारा ) :
जेवळी येथे ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेनिमित्त आयोजित राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धेला बुधवारी (ता.१९) सुरवात झाली. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ठिक- ठिकाणाहून आलेल्या चिमुकल्या कलाकारांनी विविध गीतांवर आपल्या नृत्य आविष्काराचे उत्कृष्ट सादरीकरण करित उपस्थित प्रेक्षकांची दादा मिळवली.
जेवळी येथे परंपरेने ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांची जयंती ही अक्षयतृतीयापासून तीन दिवस यात्रेच्या स्वरुपात साजरी केली जाते. यानिमित्त यात्रा समितीच्या वतिने सोळा वर्षापासून राज्यस्तरीय खोल्या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या तीन दिवशीय राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धेला बुधवारी (ता.१९) येथील बाजार मैदानावरील बसव मंचावर सुरवात झाली आहे. पहिल्या दिवशीच्या बालगट वैयक्तिक नृत्य व बाल समुह नृत्य स्पर्धेचे उद्घाटन सरपंच महानंदा पणुरे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी अध्यक्षस्थानी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश मुंडे हे होते. या प्रसंगी लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, डॉ. पूजा चिंचोलीकर, डॉ शिवराज मोघे, डॉ संतोष ढोबळे, डॉ. सिद्धेश्वर मुळे, यात्रा समितीचे अध्यक्ष बसवराज कारभारी, उपाध्यक्ष बाबूराव हावळे, सचिव मल्लिनाथ डिग्गे, आप्पासाहेब कारभारी, सुरेश डिग्गे, शिवाजी दंडगुले, शैलेश सारणे, अनिल भैरप्पा, वैभव सोळसे, महेश दरेकर, महादेव मोघे, गुंडाप्पा कारभारी, बाळासाहेब कटारे, बालाजी निंगशेट्टी आदिंची उपस्थिती होती.
यावेळी बालगटातील वैयक्तिक व समूह नृत्य स्पर्धात बालकलाकारांनी लोकगीत, लावणी, आदिवासी, देशभक्तीपर गीतासह विविध चित्रपट गाण्यावर बहारदार नृत्य सादर करुण प्रेक्षेकांना खिळवून ठेवले. या तीन दिवसीय नृत्य स्पर्धेसाठी सुत्रसंचलन शिवशरण कारभारी तर परीक्षक म्हणून रामचंद्र ढोबळे, शिवाजी माळी यांनी काम पहात आहेत.