जेवळी येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेनिमित्त तीन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन

जेवळी ( ता.लोहारा, जि.धाराशिव ) :
जेवळी येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेला शनिवार (ता.२२) पासून सुरवात होत आहे. या निमित्त सालाबादप्रमाणे येथे तीन दिवस मोठ्या प्रमाणात विविध धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
समतेचे पुजारी व वीरशैव सामाजाचे श्रद्धास्थान असेल्या महात्मा बसवेश्वरांचे येथे पुरातन मंदिर आहे. अनेक वर्षापासून येथे परंपरेने महात्मा बसवेश्वरांची जयंती ही अक्षयतृतीयापासून तीन दिवस यात्रेच्या स्वरुपात साजरी केली जाते. ही यात्रा यावर्षी शनिवार (ता.२२) ते सोमवार (ता.२४) या कालावधीत पार पडत आहे. या परिसरात ही यात्रा मोठ्या स्वरुपात साजरी होते. यावेळी परिसरातून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. शनिवारी (ता. २२) बसवेश्वरांच्या जयंतीदिनी पहाटे पाच वाजता बसवेश्वर मंदिरातील शिवलिंगास महाभिषकानी या यात्रेला प्रारंभ होते. आठ वाजता सालाबादप्रमाणे १०१ बैलजोड्याची गावातून सवाद्य मिरवणुक काढण्यात येतो.
या नंतर मंदिर समोरील मैदानावर जिल्हा स्तरीय पशु प्रदर्शन व उत्कृष्ट पशुधनास बक्षिसांचे वाटप केले जाते. संध्याकाळी चार वाजता महात्मा बसवेश्वरांच्या जीवनावर प्रवचन, तर रात्री दहावाजता मंदिरासमोरील मैदानावर अक्षता सोहळा व नंदी कट्ट्यांवर अग्नीप्रज्वलन कार्यक्रम पार पडते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (ता.२३) सकाळी आठ वाजता नंदीध्वज आणि बसवेश्वरांच्या पालकीसह गावातील मुख्य रस्त्यावरुण विविध कलापथक, सवाद्य मिरवणुक, अकरा वाजता नदिकोलासह अग्नीस्पर्श तर रात्री नऊ वाजता सजविलेल्या नंदी ध्वज, विविध चित्ररथासह छबिना मिरवणुक निघेल, रात्री अकरा वाजता शोभेचे दारु काम मंदिरा समोरील मैदानावर पार पडणार आहे.
यात्रेच्या तीसऱ्या दिवशी सोमवारी (ता.२४) अकरा वाजता भारुडाची जुगलबंदी, दुपारी चार वाजता कुस्त्यांची दंगल पार पडनार आहे. या यात्रे निमित्त होणार विविध कार्यक्रमचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष बसवराज कारभारी व सचिव मल्लिनाथ डिग्गे यांनी केले आहे.