शैक्षणिक
मुख्याध्यापक संजीव माशाळकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्निक सत्कार

लोहारा / उमरगा (प्रतिनिधी) : धाराशिव तालुक्यातील टाकळी (बें) येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजीव माशाळकर यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्ती निमित्त सपत्निक सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.
श्री संजीव माशाळकर यांचे मुळ गाव लोहारा आहे. त्यांनी ३५ वर्ष शिक्षक म्हणून नोकरी केली पण कर्तव्यात त्यांनी हलगर्जीपणा केला नाही. त्यांची कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय शिक्षक म्हणून कनगरा केंद्रातील सर्व शाळेमध्ये ओळख होती. त्यांना निरोप देताना शालेय विद्यार्थी, शालेय व्यवस्थापण समिती, सहशिक्षक आणि नागरिकांचे डोळे पाणावले होते. या सेवानिवृत्ती सत्कार समारंभास गटशिक्षणाधिकारी असरार सय्यद, विस्तार अधिकारी दैवशाला हाके, जयमाला शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी बापू शिंदे, कनगराकें द्रप्रमुख संजय तानवडे, कें द्रीय मुख्याध्यापक विलास तिघाडे, बिभिषण पाटील, विक्रम पाटील, प्रमोद शिंदे, उपसरपंच दत्तात्रय सोनटक्के, माजी सरपंच काकासाहेब पाटील, सहशिक्षक बालाजी हाजगुडे,चंद्रकांत मस्के, एम.बी. पवार, एम. आय. सय्यद, एन.एफ. शेख, एम. जी. कुलकर्णी, एन. आर. हा श्मी, ए.ए. जागीरदार, ए.ए.शेख, कनगरा केंद्रातील सह शिक्षक धनराज इंगळे, बाळासाहेब लोहार, भालचंद्र कोकाटे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश सूर्यवंशी, विशाल सूर्यवंशी, प्रशांत सोनटक्के, प्रशांत पाटील, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुरज पठाण, शाहूराज सोनटक्के, नंदकिशोर हजारे,विलास सोनटक्के, चंद्रकांत सोनटक्के, शिवशांत काकडे, दादाराव जाधव यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ पालक उपस्थित होते.




