35 वर्षीय युवकांची गळफास घेऊन आत्महत्या

औसा- प्रतिनिधी
बोरगाव(न.) ता. औसा येथील गजानन नरसिंग रसवंत (35) याने राहत्या घरातील पत्र्याच्या आडुस मफलरने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोरगाव तालुका औसा येथील मयत गजानन रसवंत यांचे वडिलांचे नावावर बोरगांव शिवारातील सर्वे नंबर ९१ मध्ये ३ हेक्टर ७० आर वडिलाच्या नावावर शेती आहे.त्याचबरोबर सोसायटीचे १ लाख ८० कर्ज असल्याचे समजते.व ईतर बँकेचे कर्ज तर आहेच शिवाय खाजगी सावकाराचे देखिल कर्ज असल्याचे ऐकावयास मिळत आहे.मयत गजानन नरसिंग रसवंत यांनी शनिवार दिनांक ४ मार्च रोजी रात्री साडे अकरा नंतर ते दिनांक ५ मार्च २०२३ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान घरातील पत्र्याच्या अडूस गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद मयताचा भाऊ संजय नरसिंग रसवंत याने भादा पोलिसात दिल्याने 12/23,कलम 174 सीआरपीसी नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत गजानन यांचेवर वैद्यकीय अधिकारी डाॕ. महेश पवार यांनी शवविच्छेदन केरुन प्रेत नातेवाईंकांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्या पश्चात्त वडील, पत्नी, १ मुलगा व १ मुलगी असा परिवार आहे. या आकस्मात घटनेचा पुढील तपास भादा पोलीस ठाणे जमादार बी टी डोलारे हे भादा ठाण्याचे प्रभारी स पो नि डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!