लोहारा शहरात वतीने लाईनमन बद्दल कृतज्ञता व्यक्त करत लाईनमन दिवस साजरा

लोहारा : देशभरातील लाईनमन बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्र शासनाने ४ मार्च २०२३ रोजी देशभरात लाईनमन दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानिमित्त विविध कार्यक्रम घेत लोहारा महावितरण उपविभागीय कार्यालयांच्या वतीने शनिवारी ४ मार्च रोजी लाईनमन दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी लाईनमन मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
महावितरणचे लाईनमन ऊन,वारा, पाऊस तसेच इतरही अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ते चोवीस तास सेवा देतात. त्यांच्या या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपकार्यकारी अभियंता श्री एस.जी.रेड्डी तर प्रमुख म्हणून शाखा अभियंता पी. आर.स्वामी,आर.एस.दीक्षित,एस. एम. केंद्रे,ए.यु.हलसे, जी.एम.मुंडे उपस्थित होते.
यावेळी शेंडगे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर उमरगा व वाघमोडे हॉस्पिटल लोहारा यांच्या वतीने हेल्थ चेकअप कॅम्प घेण्यात आला.या कॅम्प मध्ये महावितरण कार्यालयातील व विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
तसेच सर्व लाईनमन कर्मचारी यांचा सत्कार केला गेला.कामावर असताना सुरक्षा साधने वापरणे व विना अपघात काम करणार असल्याची प्रतिज्ञा घेऊन बाह्यस्त्रोत वापरनार नसल्याची शपथ यावेळी घेतली.कर्मचारी व अधिकारी यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. शेवटी भोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अभियंता चंद्रकांत जाधव यांनी केले.