लोहारा / उमरगा : लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील सिद्धांत भालेराव हा दिनांक 20 सप्टेंबर रोजी उच्च शिक्षणासाठी मुंबईहून इंग्लंडला रवाना झाला त्याची युनिव्हर्सिटी ऑफ रेडींग बर्फशायर या विद्यापीठात एम. एससी डिजिटल बिजनेस अँड डेटा अनालिसिस या कोर्ससाठी निवड झाली आहे.
सिद्धांतचे वडील प्रवीण प्रल्हाद भालेराव हे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे प्रमुख वाहतूक नियंत्रक असून आई वैशाली भालेराव या शिक्षिका आहेत.सिद्धांत याचे शालेय शिक्षण मिलिटरी पब्लिक स्कूल जम्मू,मुंबई आणि कोल्हापूर या ठिकाणी झाले असून तो सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा अभियांत्रिकीचा पदवीधर आहे. या कोर्स साठी सिद्धांत यास प्राध्यापक. डॉ के.डी सोनवणे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर आणि प्राचार्य डॉ. हरीश भालेराव संस्थापक अध्यक्ष ब्रिगेड डॉक्टर शिवाजी भालेराव सामाजिक संस्था सालेगाव यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सर्वत्र सिद्धांत यायचे कौतुक होत आहे.