मानाच्या काठयांच्या मिरवणुकीने खंडोबा यात्रेची सांगता

लोहारा : श्री खंडोबा देवस्थान कमिटीच्या वतीने धानुरी यांच्या आयोजित श्री खंडोबा याञा मोहोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाली. विविध गावातून आलेल्या मानाच्या काठयांची बुधवारी सकाळी गावातुन सवादय मिरवणूक काढुन युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या हस्ते महाआरती करुन यात्रेची सांगता करण्यात आली.
लोहारा तालुक्यातील धानुरी येथे दरवर्षी श्री खंडोबा यात्रेनिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
या वर्षीही यळकोट यळकोट जय मल्हार च्या जयघोषात बेल भंडारा उधळून ही यात्रा संपन्न झाली. यामध्ये सोमवारी (दि.५) आराधी मंडळाचा गीतगायनाचा कार्यक्रम पार पडला. तर मंगळवार (दि.६) रात्री लातुर येथील वाघ्या मुरळीचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. बुधवारी (दि. ७) सकाळी पंचक्रोशीतुन आलेल्या मानाच्या काठ्यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
यावेळी विजय वाघमारे, माजी सभापती सचिन पाटील, दिपक मुळे, महेश माशाळकर, हरी लोखंडे, धानुरीचे सरपंच प्रविण थोरात, माजी उपसरपंच बालाजी वडजे, आकाश जाधव, दत्ता गाडेकर, राम यादव, अतुल जाधव, बाबा सुर्यवंशी, रोहित कारभारी, महादेव कारभारी, तानाजी माटे, मंडळाचे अध्यक्ष श्रीधर साळुंके, खंडू जाधव, शिवाजी दुनगे, उध्दव रणखांब, बालाजी साळुंके, संभाजी जाधव, रमेश जाधव, व्यंकट धारुळे, युवराज मुसांडे, अभिजित जाधव आदीसह पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.