काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी घेतले तपसे चिंचोली येथील दत्त मंदिराचे दर्शन

किल्लारी : औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथील दत्त आश्रमात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्त जयंती यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने माँ महानंदा माता यांचा अनुष्ठान सोहळा आला. दत्त जयंती यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी तपसे चिंचोली येथील दत्त मंदिरास भेट देऊन दत्तगुरुची आरती करून दर्शन घेतले.यावेळी दत्तगुरु सेवा मंडळाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचा यतोचीत सत्कार करण्यात आला.
यावेळी बालअवधूत दत्तात्रेय महाराज , मा आमदार सोनकवडे ,मा नगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे , माजी जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील, वसंत पाटील , कृषी अधिकारी नाना पाटील ,ऍड वाघमारे , माजी सरपंच मारुती नेटके , सीताराम यादव, माणिकराव राठोड ,मनोज भोसले, गणेश कोरेकर ,महेश म्हेत्रे , संभाजी बोरूळे , गणेश बागल, महेश यादव , अतुल कोरेकर ,संतोष जाधव , प्रशांत नेटके ,यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.