संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९८ वी जयंती साजरी

लोहारा : जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग,इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा पुन्हा मिळवून लिहून काढण्याचे काम संत संताजी जगनाडे महाराजांनी केले.तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यांपैकी एक होते.दोघांची कर्मगाथा,जीवनगाथा एकमेकांशिवाय अपूर्ण ठरते.संत तुकाराम महाराजांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणारे संत तुकारामांचा पट्टशिष्य, महाराष्ट्रातील तेली समाज घडविणारे, तेली समाजाचे आराध्यदैवत, समाजसुधारक आणि राष्ट्र संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९८ वी जयंती लोहारा येथे तेली समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली.
लोहारा येथे राष्ट्र संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ सिद्धराम निर्मळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तेली समाज लोहारा तालुकाध्यक्ष भिमाशंकर डोकडे,मेडिकल असोसिएशन लोहारा तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले,नगरपंचायत गटनेत्या नगरसेविका सारिका प्रमोद बंगले, मल्लिकार्जुन कलशेट्टी,दयानंद क्षीरसागर,दत्ता निर्मळे, विजय जवादे,सुनील ठेले,उमेश जवादे,सुनिल देशमाने, गोविंद बंगले,बालाजी नाईक,पांडुरंग चौगुले,संभाजी जवादे,मिलिंद बंगले, चंद्रकांत बंगले,आकाश निर्मळे, अनिल ठेले,भागवत जवादे,गणेश खबोले यांच्यासह समाजातील महिला,नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!