५० खोके- रस्त्यावर भोके – एकदम ओके ; शहरातील हमीदनगर भागात आंदोलन

उमरगा (उस्मानाबाद ) :नारायण गोस्वामी

HTML img Tag Simply Easy Learning

५० खोके- रस्त्यावर भोके – एकदम ओक्के अशा आशयाचे फलक घेउन शहरातील हमीदनगर भागात त्रिकोळी रस्त्याच्या दुरावस्थाबाबत व रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्यात बसून शीतल चव्हाण फाऊंडेशनच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले.

उमरगा शहरातील त्रिकोळी रोडवर हमीद नगर नजीक मोठाले खड्डे पडले आहेत. एके ठिकाणी ड्रेनेज लाईनवर पडलेल्या खड्ड्याने अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच रस्त्यावर गवत माजल्याने, रस्त्यानजीक कचऱ्याचे ढीग साचल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा होत आहे.
या सर्व समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ॲड. शीतल चव्हाण फाऊंडेशनच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले.


याप्रसंगी फाऊंडेशनचे कार्यकर्ते माधव ऊर्फ दादा माने यांनी ‘५० खोके, रस्त्यावर भोके, एकदम ओक्के’ असा मजकूर लिहिलेले फलक घेवून ड्रेनेज लाईनवर पडलेल्या खड्यात ठिय्या मांडला. तसेच रस्त्यावर माजलेल्या गवतावर झोपून ‘प्रशासन झोपले, म्हणून मीही झोपलो आहे’ असे फलक दर्शविले.

यावेळी फाऊंडेशनचे पदाधिकारी व्यंकट उर्फ राजू भालेराव, धानय्या स्वामी, शांताबाई चव्हाण, किशोर बसगुंडे, अशोक कांबळे, फारुख शेख, दत्ता पावले, अनिता कांबळे यांच्यासह हमीद नगर व गणु डॉक्टर प्लॉट परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

या लक्षवेधी आंदोलनाने तरी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे डोळे उघडतील व त्रिकोळी रस्ता तात्काळ बनवतील अशी आशा नागरिकांत आहे. तरीही समस्या न सुटल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा फाऊंडेशन मार्फत देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!