लोहारा पोलीस ठाणे येथे कृषिक ऍग्रो सर्व्हिसेस तर्फे सेंद्रिय शेती कार्यक्रमचे आयोजन

लोहारा (जि. उस्मानाबाद) : आज 9 फेब्रुवारी 2023 रोजी पोलीस स्टेशन लोहारा येथे कृषिक ऍग्रो सर्व्हिसेस तर्फे मा पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी व उप विभागीय पोलीस अधिकारी श्री रमेश बरकते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अजित चिंतले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सेंद्रिय शेती व आरोग्य या विषयी कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी कृषिक ऍग्रो सर्व्हिसेस चे ऋषिकेश रविकिरण जगताप यांनी सेंद्रिय शेती बाबत वापरण्यात येणाऱ्या विविध निविष्ठा,सेंद्रिय शेती चे महत्व या बाबत माहिती दिली. कृषिक ऍग्रो मार्फत लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांनी संशोधीत व प्रमाणित केलेले गांडूळ खत,वर्मी वॉश,वर्मी कल्चर हे माफक दरात विक्री साठी उपलब्ध असल्याची माहिती दिली.
लोहारा पंचायत समिती येथील प्रभाग समन्वयक सौरभ जगताप यांनी सेंद्रिय शेती ची गरज व रासायनिक खते व कीटकनाशके यांचे आरोग्यवरील दुष्परिणाम याची माहिती दिली.
पोलीस स्टेशन परिसरातील वृक्ष,फळझाडे व फुलझाडे यांच्यासाठी व पोलीस बांधवांसाठी कृषिक ऍग्रो सर्व्हिसेस मार्फत मोफत गांडूळ खत व वर्मी वॉश चे वाटप करण्यात आले.
सदरील कार्यक्रमासाठी पोलीस स्टेशन लोहारा चे पोलीस निरीक्षक अजित चिंतले ,सहा. पोलीस निरीक्षक नलवडे साहेब,पोलीस उपनिरीक्षक रवि पवार,से. नि पोलीस उपनिरीक्षक रविकिरण जगताप,बिट अंमलदार व सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.