शहरातील ग्रामीण रुग्णालयात महाआरोग्य शिबिरात ३०६ रुग्णांची तपासणी

लोहारा : लोहारा शहरातील ग्रामीण रुग्णालयात गुरूवारी 9 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात ३०६ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
या शिबिराचे उद्घाटन वैशाली खराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष आयुब शेख, ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. गोविंद साठे, गटनेत्या सारिका बंगले, नगरसेविका कमलबाई भरारे, शमाबी शेख, सुमन रोडगे, नगरसेवक अमीन सुंबेकर, डॉ.आम्लेश्वर गारठे,डॉ. हेमंत श्रीगिरे,डॉ. रूपाली श्रीगिरे,माजी नगरसेवक अभिमान खराडे,युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार,के. डी. पाटील, आयुब शेख, दीपक रोडगे, ओम कोरे, इकबाल मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक सतिश गिरी यांनी केले. सुत्रसंचालन दस्तीगिर मुजावर यांनी केले. तर आभार अगद गिराम यांनी मानले.या मोफत महाआरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. विविध आजारांच्या तज्ञ डॉक्टरांनी रूग्णांची तपासणी केली.
३०६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये पुरुष १२९, स्ञी १७७ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये गरोदर माता तपासणी ३२ नेत्र ६२,मदुमेह अंतर्गत डोळ्याच्या पटलाची तपासणी २०, बालकांची तपासणी ५४, असंसर्गीक ७१, महालॅब रक्त तपासणी ४५,दंतरोग २८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी २१ पुरुष व ४ स्त्रीया अशा एकुण २५ जणांनी रक्तदान केले.