मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना यांच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप

लोहारा ( जि.उस्मानाबाद ) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका बाळासाहेबांची शिवसेना यांच्या वतीने लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना लोहारा तालुकाप्रमुख जगन पाटील, माजी लोहारा तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी, उपतालुकाप्रमुख परमेश्वर साळुंखे, सरपंच उदतपुर बालाजी पवार, मुख्याध्यापक बी.टी.नादरगे, माजी सरपंच मुर्षदपुर महेश पाटील, सास्तूर तंटामुक्ती अध्यक्ष फजल काद्री, माजी सरपंच चिंचोली रेबे बालेपिर शेख, महेश घोटाळे,
सतीश यादव, सुरेश दंडगुळे, संदीपान बनकर, पिंटू मुर्टे, राजेंद्र मोरे, धैर्यशील सुर्यवंशी, शिवराज चिनगुंडे आदी व शिक्षक श्रीमती.अंजली चलवाड, प्रवीण वाघमोडे, सुजित स्वामी, विठ्ठल शेळके, सूर्यकांत कोरे, सौ.संगीता भंडारे , शंकरबाबा गिरी, भीमराव गिर्दवाड आदी उपस्थित होते.