प्रभु भिसे यांचे निधन

लोहारा (प्रतिनिधी): लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथील रहिवासी प्रभु तुकाराम भिसे यांचे १८ रोजी राहत्या घरी दुःख निधन झाले ते ७५ वर्षांचे होते.
प्रभु भिसे हे गरीब कुटुंबातील व्यक्ती असुन उंडरगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून ते गावकी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,भाऊ, सुना नातवंडांचा परिवार असुन आज सकाळी १० वाजता त्यांचा त्यांच्या स्मशानभूमीत ग्रामस्थ व नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आला.