शॉर्ट सर्किटमुळे दोन सख्ख्या भावांचे घर जळून खाक

औसा – प्रतिनिधी

औसा तालुक्यातील सत्तरधर वाडी येथे दिनांक २८ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता घरातील बोर्डामध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिणगी पडल्यामुळे सर्व घरांमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली त्या आगी मध्ये घरातील संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या त्यामध्ये नगदी पैसे ८० हजार सोने तीन तोळे चांदी अठरा तोळे एक फ्रिज एक कुलर एक लोखंडी कपाट एक एलसीडी टीव्ही एकेक गादी पलंग स्वयंपाकांचे भांडे कपडे व खाण्याचे धान्य असे एकूण अंदाजे नुकसान
तीन लाख ६५ हजार रुपये झाले असल्याचा पंचनामा तलाठी यांनी औसा येथील तहसील कार्यालयात दिला अब्दुल दगडू मोगल व नवाज दगडू मोंगल या दोन सख्ख्या भावांचा घरातील संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्यामुळे हे कुटुंब रस्त्यावर
आले आहे नुकसानीचा पंचनामा तहसीलदारांना गाववाल्याकडून देण्यात आला आहे त्यांना योग्य ती मदत मिळावी अशी मागणी गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे या कुटुंबाला अंगाच्या कपड्यासहितच रस्त्यावर उभे राहण्याची वेळ
आली आहे आग एवढी भीषण होती की
नागरिकांनी प्रयत्न करून सुद्धा सर्व वस्तृ जळून खाक झाल्या
नुकसान झाल्यामुळे
या कुटुंबाविषयी मोठ्या प्रमाणात सहानुभूती निर्माण होऊन गाव हळहळ व्यक्त करीत आहे शासनाने योग्य ती मदत करून या कुटुंबाला उभा करण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी जोर धरत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!