संत तुकाराम बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात

औसा – प्रतिनिधी

औसा येथील श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर ,छत्रपती संभाजी नगर येथे सलग २६ वर्षापासून श्री जगद्गुरु संत तुकाराम महारामज बीज उत्सवानिमित्त कालपासून सुरू झालेल्या गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास दिनांक 2/3/2023 रोजी सुरुवात करण्यात आली, सर्वप्रथम सकाळी साडेआठ वाजता जगद्गुरु तुकाराम महाराज मूर्तीस दुग्धाभिषेक ,श्री राजेंद्र मोरे , यांच्या परिवारांच्या हस्ते अभिषेक करण्यात आले ,यावेळी उपस्थित श्री तम्मा स्वामी महाराज ,व जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिर पुजारी ,श्री आप्पा पवार, व उपस्थित सर्व भक्तगण , तसेच अभिषेकानंतर ,श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज मूर्ती पूजन ,गाथा पूजन , व्यासपीठ पूजन , ह. भ .प. श्री गहिनीनाथ महाराज औसेकर ,व व्यासपिठ अधिकारी ह. भ .प. श्री भागवत उदासीन महाराज औसा व महंत राजेंद्र गिरी महाराज यांच्या शुभ हस्ते पुजन करण्यात आले

यावेळी उपस्थित सर्व भक्तगण व तसेच ,सकल मराठा समाज अध्यक्ष श्री प्रदीपजी मोरे ,व औसा शहरातील व तालुक्यातील सर्व भाविक भक्तांच्या उपस्थित या गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास सुरुवात झाली आहे ,तरी या होत असलेल्या सप्ताह सोहळ्यास सर्व भक्तगण ,वारकरी संप्रदायातील वारकरी ,व तसेच औसा शहरातील ,तालुक्यातील भजनी मंडळ ,महिला भजनी मंडळ ,व तसेच सर्व

नागरिकांनी या दैनंदिन कार्यक्रमात दिनांक 2/3/2023 ते 9/3/2023 पर्यंत आपण सर्वांनी उपस्थित राहावे . आजचे दि 3/3/2023 रोजीचे कीर्तनकार – ह.भ.प.श्री .बबन महाराज आष्टा यांचे कीर्तन सेवा आहे ,तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे. असे आवाहन सकल मराठा समाज औसा व – श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर समिती छत्रपती संभाजी नगर औसा यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!