फार्मसीच्या विध्यार्थ्यानी संशोधनामध्ये भवितव्य घडवावे – विरोध पक्ष नेते अंबादास दानवे

औसा (प्रतिनिधी) फार्मसी अभ्यासक्रमाशी निगडीत विद्याथ्र्यांनी स्वत:ला फक्त मेडिकल शॉप पुरते मर्यादीत न ठेवता त्यांनी रिर्सच, क्वालिटी कंट्रोल व पॅकेजींग सारख्या क्षेत्रात स्वत:ला सिध्द करुन आपले करीअर घडवावे असे महाराष्ट्र राज्याचे विधान परीषद विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे यांनी श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसार मंडळ अंतर्गत सुरु असलेल्या विश्वेश्वर फेस्टिव्हल 2023 मधील शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी व दगडोजीराव देशमुख डी. फार्मसी कॉलेज, आलमला, ता. औसा, जि. लातूर येथे दि. 25 फेब्रुवारी 2023 वार शनिवार रोजी वार्षिक स्नेह संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले.
पुढे बोलतना कॉलेज जीवनाची मजाच वेगळी असते ते किस्से सर्वांना सांगायचे नसतात त्याची फक्त मित्रांमध्ये चर्चा करायची असते असे सागतांच सर्व विद्यार्थी हर्षकिल्लोळ करु लागले. फार्मसी क्षेत्र हे जीवनाचे अविभाज्य घटक बनले आहे यामुळे या महाविद्यालयातील विध्यार्थ्यांकरीता कॅम्पस इंटरव्यूव्हसाठी मोठ मोठया कंपन्या येण्यासाठी प्रयत्न करु म्हणाले. संस्थेच्या विविध युनिटमध्ये मोठया संख्येने संपुर्ण महाराष्ट्रसह इतर राज्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि विशेष बाब म्हणजे जम्मू अॅन्ड कश्मिरचेही विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत यावरुन संस्था दर्जेदार व्यावसायीक तंत्रशिक्षण देत असल्याचे लक्षात येते आणि ज्या विध्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण व दर्जेदार शिक्षण भेटते असेच विद्यार्थी बाहेरच्या जगात, मोठ मोठया कंपन्यामध्ये यशस्वी होत असल्याचे सांगून संस्थेचे सचिव बसवराज धाराशिवे यांचे कौतुक करुन अभिनंदन केले.
या कार्यक्रमास विठ्ठलराव गायकवाड, शिवाजी माने, बालाजी रेड्डी, संतोष सोमवंशी, नामदेव चाळक, सुनिता चाळक, शोभाताई बेंजरगे, संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, सचिव बसवराज धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, सुरेश भुरे, अवनिाश रेश्मे, भागवत वंगे, दिनेश जावळे, दिनकर मुळे, संचालक जयशंकर हुरदळे, आलमला गावचे सरपंच कैलास निलंगेकर, प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे, विश्वेश्वरय्या पॉलिटेक्नीकचे प्राचार्य प्रशांत धाराशिवे, प्राचार्य गोपाळ दंडिमे, प्राचार्या स्वाती कापसे, प्रा. दिनेश गुजराथी, डॉ. समीर शफी, प्रशांत धुमाळ, युवराज काटु, गणेश गोसावी इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे सचिव बसवराज धाराशिवे यांनी महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचा थोडक्यात लेखा जोखा सादर करुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविल्या जाणाया विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच संस्थेच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतीक कला गुणांना वाव मिळावा यासाठी विश्वेश्वर फेस्टीव्हल आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्टुंडट ऑफ द ईयर म्हणुन वैभव सांळुके, समीर मुल्ल्ला, तस्लीम शेख, प्रसाद कटारे, लांडगे प्रदीप या बी. फार्मसी, फार्म. डी.,एम. फार्मसी व डी. फार्मसी च्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सांस्कृतीक कार्यक्रमात विध्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक कला, भक्तीगीते, नृत्य, संगीतनाटय, पंजाबी, गुजराथी, हरीयाणी, मराठमोळी लावणी सादरीकरण केले. देशभक्तीपर गीतांमधुन देशाच्या वीर जवानाच्या शौर्याचे गुणगौरव केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुरज मालपानी व डॉ. सचिन हंगरगेकर यांनी केले. सदरील कार्यक्रम सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्यांने यशस्वतीरित्या संपन्न झाला.