वीजेचा शॉक लागल्याने लोहारा खुर्द येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू

लोहारा : रोहित्रातील फ्यूज बसवितान वीजेचा शॉक लागून एका ४५ वर्षीय शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील लोहारा (खुर्द) शिवारात बुधवारी (ता.१५) दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडली आहे.
सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. शेतातील गहू, हरभरा, ज्वारी, ऊसाला पाणी देण्यात येत आहे. अशा वेळी विद्युत पुरवठा वारंवार खंडित होणे, फ्यूज उडणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे अडचणी निर्माण होत आहेत. लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील शिवारातील श्री. रसाळ यांच्या शेतातील रोहिरत्राचे फ्यूज जळाले होते.ल ते बसविण्यासाठी येथील शेतकरी रतन नागनाथ पाटील (वय ४५) हे बुधवारी दुपार सव्वाचारच्या सुमारास गेले होते. काम करत असताना रतन यांना वीजेचा शॉक लागला. त्यांना तात्काळ लोहारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले. या घटनेनंतर नातेवाईक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. रात्री उशिरापर्यत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.