श्री बसवेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परिक्षत घवघवीत यश

जेवळी, ( ता.लोहारा )
जेवळी येथील श्री बसवेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परिक्षत घवघवीत यश.
२०२२-२३ या शैक्षणिक वर्षात, इयत्ता आठवी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी २१ डिसेंबरला लोहारा येथे राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परिक्षा पार पडली होती. या परिक्षेचा निकाल लागला असून येथील श्री बसवेश्वर माध्यमिक विद्यालयातील या परीक्षेला बसलेल्या अकरा विद्यार्थी पैकी कु.सुजाता राजेंद्र आपचुंदे, कु. लक्ष्मी विवेकानंद येणेगुरे, आदर्श सुधीर कोरे, आदित्य अविनाश कोरे, नारायण आनील बिराजदार व अभिजित आयलाप्पा दनाने हे सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. केंद्रशासनामार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्वात मोठी शिष्यवृत परीक्षा असून या परिक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या वतीने पुढील चार वर्षांत एकूण साठ हजार रुपयेची शिष्यवृत्ती मिळते. या विद्यार्थ्यांना विज्ञान विभाग प्रमुख आर. व्ही. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, संचालक मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सत्कार करण्यात आले.
फोटो –
जेवळी (ता. लोहारा) येथील श्री बसवेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परिक्षत यश मिळविल्या बद्दल प्रशालेत यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सत्कार करण्यात आले.