हिप्परगा (रवा) येथील ग्रामसभेत महीलांनी घेतला अवैद्य दारू विक्री बंदचा ठराव

लोहारा : लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील अवैध दारूमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी बुधवारी १५ फेब्रवारी रोजी ग्रामसभेत दारू बंदी करण्याचा महत्वपूर्ण ठराव घेण्यात आला आहे.
सरपंच अभिमान कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. यावेळी उपसरपंच विजयकुमार लोमटे, साहयक पोलिस निरीक्षक सुरेश नरवडे ,सरपंच ग्रामसेवक एस. एम. मुंडे, पोलिस पाटील संजय नरगाळे, कृषी सहायक नागेश जट्टे, यविनोद मोरे, रावण कांबळे, छाया लोमटे, स्वाती क्षीरसागर, शितल जाधव, जीवन होनाळकर, मंगल मुळे, प्रभावती हातीसकर, वत्सला जाधव, सुकमार हराळे, संजिवनी जाधव यांच्यासह मिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
गेली अनेक वर्षांपासून गावात अवैध दारू विक्री मोठ्याप्रमाणात केली जात आहे. सहज दारू उपलब्ध होत असल्याने लहानांपासून थोरापर्यंत दारूचे सेवन केले जात आहे. दारूच्या व्यसनात अनेकांची घरे उध्वस्त झाली आहेत. त्यात सद्यस्थितीत लहान मुलेही दारू प्यायला लागल्याने महिलांमध्ये अस्वस्था निर्माण झाली आसल्याने बुधवारी आयजित ग्राामसभेत महिलांनी दारू बंदीचा ठराव मांडून पारित करण्यात आला.