महाराष्ट्र

वसंतराव पाटील व नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात ” जागतिक दिव्यांग” दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न

लोहारा ( जि.धाराशिव ) : लोहारा येथील वसंतराव पाटील हायस्कूल व नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सक्षम संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने, दिनांक 03 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन यानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या यू. व्ही. पाटील मॅडम, प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून लातूर येथील संवेदना बहुविकलांग प्रकल्पाचे कार्यवाह श्री सुरेश दादा पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून सक्षम देवगिरी प्रांत प्रमुख श्री योगेश बुऱ्हाडें ,सक्षम धाराशिव जिल्हाप्रमुख श्री दत्तात्रय दंडगुले, दिव्यांग प्रतिनिधी श्री कोट्टरंगे जनकल्याण समितीचे श्री शंकर जाधव श्री बी. एल. जाधव , श्री अशोकराव पाटील, श्री शहाजी जाधव आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतमाता, संत सूरदास व ऋषी अष्टवक्र यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर हायस्कूलतर्फे सर्व मान्यवरांचे आणि दिव्यांग प्रतिनिधी श्री कोट्टरंगे व श्री दंडगुले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात श्री बुऱ्हाडें यांनी सांगितले की 03 डिसेंबर हा दिवस ” जागतिक दिव्यांग दिन” म्हणून साजरा केला जातो. याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री सुरेश दादा पाटील यांनी सांगितले की, समाजात अंध,मूकबधिर, कर्णबधिर, अस्थिव्यंग,पोलिओ बाधित, त्वचा बाधित असे विविध 21 प्रकारचे दिव्यांग आहेत. त्यांच्यासाठी शासनाने विविध सोयी – सुविधा, कायदे अंमलात आणलेले आहेत. त्यांच्या मदतीने आणि जिद्दीने आज अनेक क्षेत्रांमध्ये दिव्यांगाणी आपले कर्तृत्व सिद्ध करून यश व किर्ती प्राप्त केलेले आहे, परंतु आजही समाजामध्ये त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला दिसत नाही. यामध्ये परिवर्तन होणे खूप गरजेचे आहे ,कारण दिव्यांग व्यक्तींना जीवन जगत असताना अनेक कठीण प्रसंग व समस्यांना तोंड द्यावे लागते. समाजानेहि त्यांना आपला मदतीचा हात देवून आपल्यासोबत घेवून चालणे खूपच गरजेचे आहे. यानंतर अध्यक्षीय समारोपात प्राचार्या यू.व्ही.पाटील यांनी सांगितले की, समाजामध्ये अशा कार्यक्रमातून दिव्यांगाविषयी माहिती व जनजागृति होणे खूप महत्वाचे आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री सचिन शिंदे यांनी केले. यावेळी हायस्कूल व महाविद्यालयामधील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!