कानेगाव जवळ अचानक जनावरे समोर आल्याने चारचाकी गाडी पलटी

लोहारा : तुळजापुरहुन दर्शन घेऊन गावाकडे परत येत असताना कानेगाव जवळील ओढ्यावर अचानक जनावरे समोर आल्याने चारचाकी गाडी पलटी झाल्याची घटना शुक्रवारी २० जानेवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे.
लोहारा तालुक्यातील कास्ती बु येथील सुजित चव्हाण हे आपल्या कुटूंबासह शुक्रवारी पहाटे तुळजापुरला श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले होते. गावाकडे परत येत असताना दुपारी बाराच्या सुमारास कानेगाव जवळील ओढ्यावर अचनाक जनावरे समोर आल्याने जनावरे वाचविण्यासाठी ब्रेक दाबून गाडी बाजूने घेत असताना चारचाकी गाडी ओढ्यात पलटी झाली. या गाडीतील पाच ही जण किरकोळ मुक्कामार लागला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!