श्री. देवेंद्रजी आयलाने मित्रमंडळाचा नाविन्यपुर्ण उपक्रम

लातुर : लातुर तालुक्यातील हरंगुळ (बु) येथील देवेंद्रजी आयलाने मित्रमंडळ नेहमी वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबवत आसतात. पावसाऴ्यात मित्रांच्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळा तर्फे विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. त्या झाडांना सध्या पाण्याची गरज भासत असल्याने आता अर्जुन कसपटे या मित्रांच्या वाढदिवसानिमित्त त्या मित्रातर्फे झाडांना पाणी देऊन वाढदिवस साजरा केला जात आहे.
आज मित्रमंडळातील सहकारी मित्र सतिष दादा वाघमारे, अमोल सुरवसे, सतिष माने व सचिन घोडके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी स्वखर्चाने टॅकर द्वारे झाडांना पाणी देऊन वाढदिवस साजरा केला. तसेच या झाडांना लागणा-या लाकडी काठ्या सतिष दादा वाघमारे यांनी दिल्या. त्या सर्व काठ्या झाडांना लावण्यात आल्या आहेत. तसेच आज अध्यक्ष रमेश खोत यांनी स्वखर्चाने झाडांना आळे करवून घेतले.
यावेळी मित्रमंडळाचे अध्यक्ष रमेश खोत, देवेंद्रजी आयलाने, सुरज मोरे, दयाराम सुडे, अमोल सुरवसे, सतिष दादा वाघमारे, सतिष माने, गोविंद सगर, सुनिल कांबळे, विशाल कांबळे, मैनुद्दीन शेख, मनोज सरवदे, कुणाल सरवदे, संदेश सवई, अमर कांबळे, आकाश कांबळे, संतोष कांबळे, सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे समाज उपयोगी उपक्रम राबवत आसल्याने परिसरातील नागरिक मित्रमंडळाच्या पदाधिकारी व त्यांच्या सहकारी सदस्यांचे कौतुक करीत आहेत.