आरोग्य सेवेतील नवीन युग – शिवलिंगेश्वर मध्ये फार्म डी परिषद संपन्न

औसा : (प्रतिनिधी) तालुक्यातील आलमला येथील श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालविण्यात येत असलेल्या शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात आरोग्य सेवेतील नवीन युग- फार्म डी (डॉक्टर ऑफ फार्मसी) या विषयावर दि. 20 व 21 जानेवारी 2023 रोजी दोन दिवसीय परिषद डॉ.सुरज मालपाणी आणि सौ. विद्या कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.
“फार्म डी अभ्यासक्रमा मधील चालू घडामोडी आणि करिअरच्या संधी” या विषयावर डॉ.विशाल लउळकर यांनी मार्गदर्शन केले यामध्ये विद्याथ्र्यांना उपलब्ध संधी, संशोधन करिअर, वैद्यकीय घडामोडींच्या संधी, सरकारी नोकया, फेलोशिप तसेच आव्हाने आणि उपाय आदी विविध विषयांवर चर्चा होऊन आधुनिक युग हे फॉर्म डी (डॉक्टर ऑफ फार्मसी) अभ्यासक्रमाचे आहे त्यामुळे सर्व विद्याथ्र्यांना फार्मसीतील मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे असे सांगितलेे.
डॉ.अशोक गिरी, क्लिनिकल फार्माकोलॉजिस्ट, अपोलो मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल, लातूर यांनी ‘हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल फार्माकोलॉजीस्ट (फार्म डी) ची भूमिका’ या विषयावर विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे, डॉ.समीर शफी, श्री.धुमाळ प्रशांत, डॉ.फुकटे अजय ईत्यादी उपस्थित होते. परीषदेचे सूत्रसंचालन अश्विनी सगर आणि हिरनमई धर्माधिकारी यांनी केले तर आभार विद्या कापसे यांनी मानले.
परीषदेचे आयोजन इन्स्टिट्यूट इंनोवेशन कौन्सिल, फार्मसी प्रॅक्टिस डिपार्टमेंट व फार्म डी (चौथे आणि पाचवे) वर्षाच्या विद्याथ्र्यांनी केले, याबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, सचिव बसवराज धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे यानी अभिनंदन केले.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!