मोघा बु, बेलवाडी, खेड येथील असंख्य युवकांचा शिवसेनेत प्रवेश

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील मोघा बु, बेलवाडी, खेड येथील असंख्य युवकांचा शिवसेना पक्षात आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते प्रवेश घेतला. लोहारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील शिवसेना संपर्क कार्यालयात दि.29 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित कार्यक्रमामध्ये मोघा बु येथील अरुण सुर्यवंशी, विष्णू जाधव, ओम सुर्यवंशी, तानाजी जाधव, राहुल कोणे, दगडु सुर्यवंशी, शुभम हत्ते, अतुल जाधव, विशाल सुर्यवंशी, अनिल जाधव, प्रकाश सुर्यवंशी, बेलवाडी येथील विजय गुळवे, रमेश शिंदे, कुमार पवार, अदीरथ जाधव, सागर कदम, गोपाळ जाधव, रामकृष्ण शिंदे, उध्दव मोरे, खेड येथील बबलु राठोड यांचा पक्ष प्रवेश झाला. आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते या युवकांचा येथोचित सत्कार करून पक्ष प्रवेश देण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख मोहन पणुरे, तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, अरुण जगताप, माजी गटनेते अभिमान खराडे, नगरसेवक अविनाश माळी, नगरसेवक अमिन सुंबेकर, नगरसेवक गौस मोमिन, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, युवा सेना तालुका प्रमुख दत्ता मोरे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, ओम कोरे, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, इंद्रजित लोमटे, सुरेश दंडगुले, आदित्य चव्हाण, श्रीकांत बिराजदार, श्रीशैल ओवांडे, लोहारा खुर्द सरपंच सचिन रसाळ, युवराज जाधव, नारायण क्षीरसागर, रमेश जाधव, दत्ता पाटील, हिप्परगा रवा सरपंच अभिमान कांबळे, आप्पासाहेब पाटील, कुलदीप गोरे, राम लोमटे, अशोक जाधव, परवेज तांबोळी, बालेपीर शेख, फजल कादरी, अविनाश राठोड, सुखा सातपुते, बाळु कांबळे, नयुम सवार, लहु रोडगे, राजेंद्र क्षीरसागर, अमोल माळी, अंकुश नारायणराव, संजय दरेकर, वहाब हेडडे, बबन भोंडवे, अंगद भोंडवे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.