जेष्ठ शेतकरी महादेव कारभारी यांचे निधन

जेवळी, ता.१५ (ता.लोहारा ) : लोहारा तालुक्यातील जेवळी येथील जेष्ठ शेतकरी महादेव शरणाप्पा कारभारी (वय- ७८) यांच शनिवारी (ता.१५) पहाटे चारच्या सुमारास पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर जेवळी येथे सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला. येथील पुणे येथे अँकर इलेक्ट्रिक कंपनीत नौकरी करीत अलेले उमाकांत कारभारी यांचे ते वडील होत.