माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा

मुरूम ( ता.उमरगा ) : भारत शिक्षण संचलीत, कला वाणिज्य व विज्ञान क.महाविद्यालय, मुरूम येथे आज शनिवारी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन” म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.

HTML img Tag Simply Easy Learning

अब्दुल कलाम यांच्या प्रतीमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.दिलीप इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.बेलकेरी व्ही.आर यांनी केले.त्यानी कलाम यांचा जिवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला.त्यांचा जन्म आंधृप्रदेशातील रामेश्वर जवळील एका लहानशा खेड्यात झाला.त्यांचे उच्च शिक्षण मद्रास येथील महाविद्यालयात झाले व त्यांनी पुढील शिक्षणासाठी एम.आय.टी. मध्ये एरोस्पेस इंजिनीअरिंग पूर्ण केले.त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण व शेवटी देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.1998 मध्ये पोखरण येथे अणुचाचणी घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांना मिसाईल मॅन संबोधले गेले. तद्नंतर महाविद्यालयाचे प्राचार्य इंगोले सर म्हणाले की युवकांनी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वेगवेगळ्या गृंथाचे वाचन केले पाहिजे.

वाचनातून विचार निर्मिती होते व त्याचा उपयोग स्वतः बरोबर राष्ट्राला होऊ शकतो असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.किसन माने यांनी केले तर आभार प्रा.विनय इंगळे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!