सास्तुर चौरस्त्याजवळ ट्रॅक्टर दोन ट्रॉलीसह पलटी

लोहारा : लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील माकणी रस्त्यावरील पुलावरून टॅक्टरसह दोन ट्रॉली पलटी झाल्या आहेत. ही घटना सोमवारी १६ जानेवारी रोजी पहाटे घडली आहे.यात कुठलीच जीवित हानी झाली नाही.
सुञाकडून मिळालेली माही अशी की, साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाण्यासाठी ट्रॅक्टर व इतर वाहानांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. भाऊसाहेब कारखान्यावर ऊस खाली करून दोन ट्रॉली असलेले एक ट्रॅक्टर सास्तूर मार्गे माकणीकडे निघाले होते. दरम्यान, सास्तूरजवळील पुलावर आल्यानंतर वाहन चालकाचा अंदाज चुकल्याने दोन ट्रॉलीसह ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळले. यात ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कुठलीच जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी येऊन घटनेचा पंचनामा केला. सास्तूरजवळ एक मोठा ओढा आहे. या ओढ्यावर पूल बांधण्यात आला आहे. मात्र या पुलाला संरक्षित कठडे बसविण्यात आले नाहीत. रात्रीच्या सुमारास समोरून वाहन आल्यानंतर पुलाचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताच्या घटना घडल्या जात असताना संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!