न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलला पोलिस निरीक्षक श्री चिंतले यांची सदिच्छा भेट

लोहारा : लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये लोहारा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री अजित चिंतले यांनी सदिच्छा भेट दिली.

याप्रसंगी स्कूलचे प्राचार्य श्री शहाजी जाधव यांच्या हस्ते त्यांचे शॉल व पुस्तक भेट देवून सत्कार करण्यात आला,यावेळी पोलिस उप निरीक्षक श्री गुलजारखान पठाण, संचालिका सौ सविता जाधव, पालक प्रतिनिधी श्री रमेश वाघुले आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी चिंतले साहेब यांनी लोहारा शहर व तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची सुरक्षा यासाठी पिंक पथक कार्य करत असून, यासंबधित काम करण्याची जबाबदारी उमरग्याचे माने मॅडम व महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडून नकळत वाढते सायबर क्राईम वाविषयीची काम व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी श्री जगताप यांच्याकडे असल्याचे सांगितले.

HTML img Tag Simply Easy Learning

याविषयी सविस्तर माहिती दिली व त्यावर चर्चा करून प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्हि बसवून व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक- कर्मचारी आणि पालक यांनी योग्य काळजी व खबरदारी घेतल्यास असे गुन्हे टाळता येतील असे सांगून या सर्वांनीच पोलिस प्रशासनास वेळोवेळी सहकार्य करण्याचे आवाहन केले, आणि स्कूलच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!