लोहारा शहरात आ.ज्ञानराज चौगुले यांचे शिवसेना लोहारा तालुका संपर्क कार्यालयाचे नवीन स्थांलरीत जागेत उद्घाटन

इक्बाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील आंबेडकर चौकातील गोरे कॉम्प्लेक्स येथे युवा नेते शुभम ज्ञानराज चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन जागेत स्थांलरीत आ.ज्ञानराज चौगुले यांचे शिवसेना लोहारा तालुका संपर्क कार्यालयाचे नवीन स्थांलरीत जागेत उद्घाटन दि.24 सप्टेंबर 2023 रोजी ज्येष्ठ नेते शिवाजी अप्पा कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील होते तर प्रमुख म्हणून नगराध्यक्षा वैशालीताई खराडे, गटनेत्या सारिका बंगले, प्रताप लोभे, अभिमान खराडे, नगरसेवक अमिन सुंबेकर,अविनाश माळी, नगरसेवक जालिंदर कोकणे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, राजेंद्र माळी, पं. स. माजी सदस्य दिपक रोडगे, ओम कोरे,
विनोद मुसांडे, परवेज तांबोळी, बालेपीर शेख, फजल कादरी, सरपंच सचिन रसाळ, मल्लिनाथ घोंगडे, रोहन खराडे, सुखा सातपुते, संजय दरेकर, नयुम सवार, वहाब हेडडे, प्रशांत थोरात, देवा महाजन, बाळु कांबळे, दिनेश माळी, लहु रोडगे, गणेश कमलापुरे, आदि उपस्थित होते.
यावेळी शुभम चौगुले यांचा लोहारा तालुका शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनोद मुसांडे यांनी केले तर आभार अभिमान खराडे यांनी मानले. या कार्यक्रमास शहरातील व तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.