उस्मानाबाद ,लातुर जिल्ह्यातील काही गावात वेळा अमावास्या साजरी

उस्मानाबाद : वेळ आमवस्याच्या पहिल्या दिवशी उस्मानाबाद ,लातुर जिल्ह्यातील काही गावातील लोकांना निजाम सरकारने अटक केल्याने या चार गावात तेव्हा पासून वेळ आमवस्या साजरी केली जात नाही. पण या चार गावात मकर संक्रांती दिवशी रविवारी 15 जानेवारी रोजी वेळ आमवस्य सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी वनभोजनाचा अनंद घेतला.
निजाम राजवटीला विरोध केल्याने वेळ आमवस्याच्या पहिल्या दिवशी लोहारा तालुक्यातील चार, औसा तालुक्यातील दीड गावे, तर उस्मानाबाद तालुक्यातील एक अशा साडेसात गावांतील लोकांना निजाम सरकारने अटक केली. तेव्हापासून या साडेसात गावांत वेळा आमवस्या साजरी केली जात नाही. मात्र मकर संक्रांतीला साडेसात गावांत वेळ आमवस्य साजरी केली जाते. काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी शेतशिवार पूजेला अनन्यसाधारण महत्व आहे.
मृग नक्षत्रातील खरीप पेरणीपासून सातवी आमवस्या म्हणजे वेळ आमवस्या. शेतकरी वेळ आमवस्याला शेतात पांडवांची पूजा बांधतो पांडवांना कडब्याच्या पेंड्या लावल्या जातात. पांडवाच्या पूजेसाठी केळीच्या पानावर उंडे, भज्जी, आंबील, खीर, बाजरीची भाकरी, भात याचा नेवैद्य दाखवला जातो. पूजेनंतर पांडवांच्या पुढे दिवसभर जेवणाच्या पंगती बसविल्या जातात. परंतु निजाम राजवटीच्या वेळी लोहारा तालुक्यातील भातागळी, नागूर, खेड, कास्ती (बु), उस्मानाबाद तालुक्यातील भंडारी, धुत्ता तर औसा तालुक्यातील उजनी व अर्धे आशीव या साडेसात गावांतील नागरिकांना निजाम सरकारने वेळ आमवस्येच्या पहिल्या दिवशी अटक करून तुरुंगात टाकले होते.
त्यामुळे दुसर्या दिवशी साजरी होणारी वेळ आमवस्या गावात पुरुष मंडळी नसल्याने व या अटकेला विरोध म्हणून साडेसात गावात सण साजरा होऊ शकला नाही. त्या काळापासून आजपर्यत या गावांमध्ये वेळा आमवस्या दिवशी सण न साजरा करता मकर संक्रांतीच्या दिवशी साजरा करण्याची परंपरा आहे. त्यानुसार रविवारी मकर संक्रांतीच्या दिवशी या साडेसात गावात वेळ आमवस्या मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नागरीकांना वनभोजनाचा अनंद घेतला.