किल्लारीसह परिसरात स्नेहाच्या गोडव्यात मकरसंक्रांती साजरी

किल्लारी :- औसा तालुक्यासह किल्लारी, लामजना ,तपसे चिंचोली सह परिसरात रविवारी मकरसंक्रांतीचा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सुवासिनी महिलांना एकमेकींना वाण देऊन मकरसंक्रांती सण साजरा केला.मकरसंक्रांतीच्या निमित्ताने गावोगावची मंदिरे महिलांच्या गर्दीने फुलून गेली होती.
दिवाळी सणा नंतर येणारा महत्वाचा सण म्हणून मकरसंक्रांती सणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे .
त्यासाठी महिला व मुलींनी नवनवीन साड्या दागिन्यांची खरेदी केली होती.
गावोगावच्या मंदिरामध्ये महिलांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी ओवसने हा पारंपरिक विधी पार पडला.
सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत तिळगुळ देणे,ओवसने ,वाण लुटणे साठी गर्दी दिसून आली.
एकमेकींना तिळगुळ देऊन गोडीगुलाबीने गुण्या गोविंदाने राहण्याचे वचन एकमेकींना देण्यात आले.यावेळी महिलांच्या वतीने सुगडाची ही पूजा करण्यात आली.