झाडांना पाणी देऊन केला वाढदिवस साजरा

लातुर : लातुर तालुक्यातील हरंगुळ (बु.) येथील देवेंद्रजी आयलाने मित्रमंडळ नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहतात. आज मित्रमंडळाचे सदस्य सागर वाघमारे यांचा वाढदिवस झाडांना पाणी देऊन साजरा करण्यात आला. हे सर्व झाडे मित्रांच्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळा तर्फे लावण्यात आली आहेत. त्या झाडांना सध्या पाण्याची गरज पडत असल्याने आता मित्रांच्या वाढदिवसानिमित्त त्या झाडांना पाणी देण्याचे कार्य चालू आहे.
यावेळी कपिल बरुरे, गोविंद शेळके (बाबा), अमोल आयलाने, बाळासाहेब शेळके, गोविंद बिर्ले, प्रविण जटाळ, सोपान अलापुरे, सागर वाघमारे, श्रीराम बरुरे, राजकुमार जटाळ, सुलचंद माळी, देवेंद्र आयलाने उपस्थित होते.