लोहारा शहरातील सदाशिव हिरेमठ संस्थान येथे शिवनाम सप्ताह सुरु

लोहारा : लोहारा शहरातील सदाशिव हिरेमठ संस्थान येथे रविवार पासुन अखंड शिवनाम सप्ताहास प्रारंभ झाला आहे. ११ डिसेंबर पर्यत शिवपाठ, अभिषेक, श्री परामराहस्य पारायण, भजन, कीर्तन, शिवजागर आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
रविवारी सकाळी शहरातील सदाशिव हिरेमठ संस्थान येथे अभिषेक झाला. त्यानंतर आ.ज्ञानराज चौगुले,नगरध्यक्षा वैशाली खराडे, उपनगरध्यक्ष आयुब शेख, डॉ.आम्लेश्वर गारठे,डॉ.बाळासाहेब भुजबळ, डॉ.चंद्रशेखर हंगरगे आदी मान्यवरांच्या हस्ते पंचाचार्य पूजन, ध्वज पूजन, विना पूजन, टाळ पूजन, मृदंग पूजन, पेटी पूजन करण्यात आले.
यावेळी सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज, तालुका समन्वयक समितीचे माजी अध्यक्ष नागाण्णा वकील,माजी सरपंच शंकर जट्टे, बाळासाहेबाची शिवसेना तालुकाप्रमुख जगन पाटील, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, नगरसेवक अमिन सुंबेकर ,दिपक मुळे,अविनाश माळी,अभिमान खराडे,के. डी.पाटील, माधवराव पाटील,श्रीकांत भरारे, दिपक रोडगे,हरी लोखंडे,दत्तात्रय फावडे, श्रीशैल्य पाटील,संगाप्पा माणिकशेट्टी,अमोल वाले, महेश पाटील, बाजीराव पाटील,मल्लिनाथ घोंगडे, शांतीवीर हुलसुरे यांच्यासह आदी उपस्थित होते.
या शिवनाम सप्ताह व्यासपीठ प्रमुख शि.भ.प. शिवलिंगप्पा संगशेट्टी, शि.भ.प. भागवत बेळे महाराज हे आहेत. माहेश्वर मंडळात पंचय्या स्वामी, संगन्ना स्वामी, रामेश्वर स्वामी, बबन स्वामी यांचा सहभाग आहे. या सप्ताहात प्रसिद्ध शिव कीर्तनकार शि.भ.प. महादेवी मठपती (ननंद), शि.भ.प. धनराज बुलबुले (सामनगाव), शि.भ.प. भाग्यश्री शेरे-पाटील (दवन हिप्परगा), शि.भ.प. लक्ष्मण विभुते (माळकुंजी), शि.भ.प. किर्तीताई हिरेमठ (लातूर), शि.भ.प. विश्वनाथ स्वामी (वडवळ), शि.भ.प. निलकंठ विभुते (माळकुंजी) तर शेवटचे कीर्तन शि. भ. प. कुमार सागर स्वामी (लोहारा ) यांचे होणार आहे.
या सप्ताहानिमित्त अन्नदात्यांकडून महाप्रसाद व अल्पोपहार देण्यात येणार आहे. परिसरातील भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.