अंकोली गावचे नवनियुक्त सरपंच व सदस्य यांचा मित्रमंडळाच्या वतीने सत्कार

HTML img Tag Simply Easy Learning
लातुर : अंकोली गावचे नवनियुक्त सरपंच समाधान आडगळे, सर्व सदस्य व मार्गदर्शक यांचा काल देवेंद्रजी आयलाने मित्रमंडळ हरंगुळ बु यांच्या वतीने यथोचित सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले व त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. त्या सर्वांची गावाच्या विकासासाठी करावयाची धडपड व तळमळ आणि विचार पाहून मनस्वी आनंद झाला. नक्कीच आपल्या हातून गावच्या विकासासाठी कार्य होवो हीच सदिच्छा पुनश्च एकदा आपल्या सर्वांचेच मनापासून अभिनंदन..


यावेळी मित्रमंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व वितरण अंकोली गावचे नवनियुक्त सरपंच समाधान आडगळे, साहेबराव मुळे (बप्पा), नेहमी इतरांसाठी धडपड करणारे, मदतीला धावून जाणारे श्री. गोविंद मुंढे, बालाजी मुळे, लिंबराज शिंदे, सुभाष धोत्रे, दत्ता जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!