बापुराव पाटील यांचा केला कोराळच्या नुतन सरपंच, उपसरपंचानी सत्कार

मुरुम : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन श्री बापुराव पाटील यांचा कोराळ येथील नूतन सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन श्री बापूराव पाटील यांच्या हस्ते कोराळ ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच सौ मंजुषा बाळू सगर व उपसरपंच सौ निर्मला भरत भगत यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्री दिलीप भालेराव, उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेस सचिव गौस भैय्या शेख, उपाध्यक्ष उमरगा तालुका युवक काँग्रेस सोशल मीडिया अमरजीत भरत भगत, नूतन ग्रामपंचायत सदस्य जीवन विलास शिंदे पाटील, विठ्ठल शिवाजी लाळे, रेखा शिवहरी कांबळे, अशोकराव पाटील ,हरिदास पवार, भरत आबा भगत, राजू गायकवाड, सतीश गायकवाड यांच्यासह आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.