लोकवाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

लोहारा : लोहारा येथील लोकवाचनालयात गुरुवारी (दि.१२) राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा वंदना भगत, नगरसेविका शमाबी शेख, उद्योजिका लक्ष्मी सोमवंशी, नगरसेवक अमीन सुंबेकर, विजय ढगे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भगत, माजी नगरसेवक आयुब शेख, निळकंठ कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकवाचनालयाचे सचिव माणिकराव तिगाडे यांनी केले.

यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा वंदना भगत यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक शाम नारायणकर, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, माजी ग्रामपंचायत सदस्य महेबूब गवंडी, सलीम शेख, शब्बीर गवंडी, हाजी बाबा शेख, गिरीश भगत, संजय काटे, महेबूब पठाण, हुकूम इनामदार, संजय जेवळीकर, मीनाक्षी बनसोडे, जयश्री लांडगे, मनीषा महानोर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक लोकवाचनालयाचे सचिव माणिकराव तिगाडे यांनी केले. सुत्रसंचालन तानाजी माटे यांनी तर अमोल बिराजदार यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!